गुजरात निवडणूक – जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा

अहमदाबाद – गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. पटेलांचं वर्चस्व असलेल्या सुरतमधील वरच्चा रोड येथून काँग्रेसने प्रफुल्ल तोगडिया यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या कार्यालयाजवळच दोन्ही कार्यकर्ते आपापसांत भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी केला आहे. काँग्रेसने रात्री उशिरा 77 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसच्या यादीत पाटादीर अनामत आंदोलन समितीच्या दोन नेत्यांच नाव होतं.

पटेल आरक्षणा फॉर्म्युल्यावरुन काँग्रेस आणि पाटादीर अनामत आंदोलन समितीच्या नेत्यांमध्ये रविवारी बैठक झाल्यानंतर, दोन्ही पक्षांनी यशस्वी चर्चा झाली असल्याचा दावा केला होता. पण अद्यापही चर्चा अपुर्ण असून अनेक गोष्टी पुर्णत्वास नेण्याचं बाकी असल्याचं दिसत आहे. काँग्रेसने यादी जाहीर करताच पटेल आणि काँग्रेसमधील चर्चेचा बुडबुडा फुटला. काँग्रेसच्या 77 उमेदवारांच्या यादीत दोन पाटीदार नेत्यांना जागा देण्यात आली आहे.