मानखुर्दमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू

मुंबईतील मानखुर्द भागात असलेल्या भंगार गोडाऊनला आग लागली आहे. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाचे ४ बंब आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत. ही आग नेमकी का लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. या आगीचे लोळ इतक्या मोठ्या प्रमाणावर आकाशात पसरले होते की घाटकोपरमधूनही ही आग पाहाता येत होती.