ओखी चक्रीवादळ तडाखा : मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू, किनारपट्टी परिसरात सतर्कतेचा इशारा

मुंबई – ओखी वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सोमवारी संध्याकाळी पाऊस झाला. मंगळवारीही (5 डिसेंबर) पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

Live Updates :

पुढील 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

महापरिनिर्वाणदिनासाठी पोहोचलेल्या अनुयायांनी चौपाटीवर जाऊ नये, प्रशासनाची विनंती

मुंबई-कोकणच्या किनारी भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा

आज मुंबई-ठाणे-रायगड जिल्ह्यांतील शाळांना सुटी

समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी जाऊ नये, प्रशासनाचा इशारा

वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका, पोलिसांचं आवाहन.

कोकण, मुंबईच्या किनाऱ्यावर धडकलेल्या ओखी वादळामुळे मुंबईत सोमवारी (4 डिसेंबर)रात्रीपासून अनेक भागात पाऊस

मुंबई : हवाई वाहतुकीवर परिणाम, विमान सेवा 40 मिनिटं उशिरानं

आज संध्याकाळपर्यंत वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार