पुढच्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेस 135 जागा जिंकेल – राहुल गांधी

अहमदाबाद – गुजरात दौ-यावर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी गुजरात निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. गुजरातमध्ये पुढचे सरकार काँग्रेस स्थापन करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडणुकीत गुजरातमध्ये नवीन नेतृत्व उदयाला येत असल्याचे दिसले. राज्यात पुढचे सरकार आपले असेल असे त्यांनी सांगितले. पुढच्या निवडणुकीत गुजरातमध्ये आपण 135 जागा जिंकू असे राहुल म्हणाले.