Kamala Mills fire : मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठकला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई – कमला मिल अग्निकांडाप्रकरणी अटक करण्यात आलेला मोजो बिस्ट्रो पबचा मालक युग पाठक याची 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रात्री उशिरा अटक करण्यात आलेल्या युग याला आज भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.